होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

युवा प्रतिभा

युवा प्रतिभा

मोहीमेबद्दल

भारताला त्याच्या विशिष्ट संस्कृतीमुळे विविधतेचा पर्यायी शब्द म्हणून ओळखले जाते. भारतात माणसांचा, धर्मांचा, परंपरांचा, खाद्यपदार्थांचा, कलाप्रकारांचा, संगीताचा विस्तृत वर्ग आहे. देशभरातील नव्या प्रतिभांना ओळखून आणि मान्यता देऊन तळागाळातील भारतीय संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 'युवा प्रतिभा' ही प्रतिभेचा शोध घेणारी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये भारताचे नागरिक येतात आणि सार्वजनिक क्षेत्रात मान्यता मिळवण्यासाठी सहभागी होतात. येथे मायगव्ह विविध शैलीच्या नागरिकांना गायन, चित्रकला आणि पाककला क्षेत्रातील सार्वजनिक व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी देत आहे.

युवा प्रतिभा

Last Date - 16th July 2023

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याने लोकसंगीताच्या विविध प्रकारांमध्ये मोठे योगदान दिले आहे. भारतातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्राचे स्वतःचे लोकसंगीत आहे, जे जीवनशैलीचे प्रतिबिंब दर्शवते. विविध गायन प्रकारातील नवीन आणि तरुण प्रतिभा ओळखून आणि मान्यता देऊन भारतीय संगीताला तळागाळापर्यंत राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, मायगव्ह, सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत गायन प्रतिभा शोधचे आयोजन करत आहे, ज्याचा उद्देश विविध गायन प्रकारांमध्ये नवीन आणि तरुण प्रतिभा ओळखून आणि मान्यता देऊन भारतीय संगीताला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देणे आहे.

युवा प्रतिभा

Last Date - 20th July 2023

चित्रकला प्रतिभा शोध ही देशभरातील नागरिकांसाठी आपली कलात्मक प्रतिभा आणि कौशल्य दाखवून राष्ट्रीय मान्यता मिळवण्याची अनोखी संधी आहे. भारतीय चित्रकलेच्या विविध शैली प्रदेश ते प्रदेश अशा आहेत ज्यामध्ये प्रागैतिहासिक काळापासून अनेक बदल झाले आहेत. जागतिक पटलावर भारतीय कलेचे वेगळे स्थान आहे. इतर स्वरूपांच्या तुलनेत भारतीय चित्रकला अधिक काळासाठी कलाकाराच्या कल्पना आणि भावना चित्रण करण्यास सक्षम आहेत. संस्कृती संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने मायगव्ह 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत 'युवा प्रतिभा चित्रकला प्रतिभा हंट' चे आयोजन करत आहे.

अन्न हे भारताच्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येला, संस्कृतींना आणि परंपरांना एकत्र आणणाऱ्या बंधांपैकी एक आहे आणि भारताच्या समृद्ध पाककलेच्या वारशाचे चिंतन करून ते जगाला चवीच्या, आरोग्याच्या, साहित्याच्या आणि पाककलेच्या दृष्टीने काय देऊ शकते याचे महत्त्व समजून देते. त्याचप्रमाणे मिलेट हा देखील भारतीय खाद्यपदार्थांचा महत्त्वाचा भाग असून मिलेटबाबत जनजागृती करणे व त्याचा उत्पादन व वापर वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष भारताने प्रस्तावित केल्यानुसार आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केले आहे. म्हणून मायगव्ह IHM पुसा यांच्या सहकार्याने 'युवा प्रतिभा-पाककला प्रतिभा शोध' आयोजित करत आहे, ज्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या स्वयंपाक कौशल्याचे प्रदर्शन करतील आणि राष्ट्रीय मान्यता मिळवतील.

बक्षिसे

गायन प्रतिभा शोधसाठी


गायन

चित्रकला आणि पाककला प्रतिभा शोधसाठी


चित्रकला
आपल्या ज्युरीबद्दल जाणून घ्या
शंकर महादेवन

शंकर महादेवन
(गायनासाठी)

शेफ कुणाल कपूर

शेफ कुणाल कपूर
(पाककलेसाठी)

शेफ मंजीत गिल

शेफ मंजीत गिल
(पाककलेसाठी)

प्रेस रिलीज