होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

अटी आणि शर्ती

या वापरासंबंधी अटी mygov.in (मायगव्ह) चा वापरकर्ता म्हणून आपले अधिकार आणि जबाबदारीबद्दल माहिती देतात. मायगव्ह खाते उघडण्यासाठी आपण या वापरासंबंधी अटी मान्य करणे आवश्यक आहे.

मायगव्ह, NIC, MeitY आणि भारत सरकारला मायगव्ह आणि या वापरासंबंधी अटींमध्ये कधीही बदल करण्याचा अधिकार आहे. जर हे बदल आपल्या अधिकारांवर किंवा जबाबदाऱ्यांवर परिणाम करत असतील, तर आपल्याला मायगव्ह द्वारे सूचित केले जाईल.

मायगव्ह वरील आपल्या वापरास नियंत्रित करणाऱ्या ज्या कोणत्याही अटी आणि शर्ती आपण पूर्वी स्वीकारल्या होत्या त्यांची जागा खालील अटी घेतील आणि त्या लागू होतील. जेव्हा आपण पुढील अटी आणि शर्ती स्वीकारल्या आणि आपले मायगव्ह खाते उघडले तेव्हापासून या अटी व शर्ती लागू होतात.

मायगव्ह चा वापरकर्ता म्हणून आपल्याला या वापरासंबंधी अटींनुसार मायगव्ह आणि सामग्री पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी गैर-विशेष, हस्तांतर न करता येण्याजोगा, रद्द करता येण्याजोगा, मर्यादित परवाना दिला जातो. प्रदाता कोणत्याही कारणास्तव कोणत्याही वेळी हा परवाना रद्द करू शकतो.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे मायगव्ह डिझाईन आणि आयोजित केले गेले आहे आणि भारत सरकारच्या विविध संस्था, विभाग आणि मंत्रालयांद्वारे सामग्री प्रदान केली जाते.

मायगव्ह वरील सामग्रीची अचूकता आणि व्यावहारिकता याची खात्री करून घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी, यास कायद्याचे विधान म्हणून मानले जाऊ नये किंवा कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी वापरले जाऊ नये. कोणतीही अस्पष्टता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना संबंधित मंत्रालय / विभाग / संस्था आणि / किंवा इतर स्रोताद्वारे त्याची पडताळणी / तपासणी करण्याचा आणि योग्य व्यावसायिक सल्ला प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातो.

मायगव्ह वापरल्यामुळे उद्भवणारा किंवा त्याच्या वापराशी निगडीत कोणत्याही खर्चासाठी, नुकसान किंवा हानीसाठी सरकारी मंत्रालय / विभाग / संस्था जबाबदार राहणार नाही आणि यामध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी किंवा डेटा वापरल्यामुळे किंवा न वापरल्यामुळे उद्भवणारा कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा किंवा नुकसान यांचा समावेश असेल.

वापरासंबंधी मर्यादा:

मायगव्ह वरील सामग्री केवळ आपल्या वैयक्तिक वापरासाठी आहे, व्यावसायिक शोषणासाठी नाही. आपण मायगव्ह ला डीकंपाइल करणे, रिव्हर्स इंजिनिअर करणे, वेगळे करणे, भाडे किंवा भाडेपट्टी देणे, कर्ज देणे, विक्री करणे, उप-परवाना देणे, किंवा अवांछित अनुकरण करणे अशी कार्ये करू शकत नाहीत. तसेच आपण साइट आर्किटेक्चर निर्धारित करण्यासाठी किंवा वापर, वैयक्तिक ओळख किंवा वापरकर्ते यांच्या विषयी माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही नेटवर्क मॉनिटरिंग किंवा डिस्कव्हरी सॉफ्टवेअरचा वापर करू शकत नाही. प्रदात्याच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय आपण मायगव्ह वर लक्ष ठेवण्यासाठी किंवा कॉपी करण्यासाठी आपण कोणत्याही रोबोट, स्पायडर, इतर स्वयंचलित सॉफ्टवेअर किंवा डिव्हाइस किंवा मॅन्युअल प्रक्रियेचा वापर करणार नाही. आपण या वापरासंबंधी अटींच्या कॉपीराइट धोरणाद्वारे परवानगी दिलेल्या मर्यादेबाहेर, मायगव्ह च्या सर्व किंवा कोणत्याही भागास व्यावसायिक, गैर-नफा किंवा सार्वजनिक हेतूंसाठी कॉपी, सुधारित, पुनरुत्पादित, पुनर्प्रकाशन, वितरण, प्रदर्शन किंवा प्रसारित करणार नाही. मायगव्ह चा कोणत्याही प्रकारे अनधिकृत वापर करण्यास मनाई आहे. मायगव्ह तर्फे स्पष्टपणे लिखित स्वरुपात अधिकृत केल्याशिवाय, वेबसाइट पेजवर प्रवेश, देखरेख किंवा कॉपी करण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरचा (उदा. बॉट्स, स्क्रॅपर टूल्स) किंवा इतर स्वयंचलित उपकरणांचा वापर करण्यास मनाई आहे.

आपल्या सामग्रीच्या संदर्भात धोरण:

मायगव्ह वर सामग्री अपलोड करून किंवा वापरण्यासाठी कोणतेही साहित्य सबमिट करून, आपण असे साहित्य वापरण्यासाठी, पुनरुत्पादित करण्यासाठी, सुधारित करण्यासाठी, अनुकूलन करण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी, सार्वजनिकरित्या सादर करण्यासाठी, सार्वजनिकरित्या किंवा डिजिटली प्रदर्शित करण्यासाठी आणि त्याचा डिजिटली अनुवाद करण्यासाठी, त्याचे अनुकरण कार्य करण्यासाठी आणि असे साहित्य वितरित करण्यासाठी किंवा आता ज्ञात असलेल्या अथवा या नंतर विश्वात विकसित होणाऱ्या कोणत्याही स्वरूपात, माध्यमात किंवा तंत्रज्ञानात अशा साहित्याचा समावेश करण्यासाठी मायगव्ह ला अखंड, जागतिक स्तरीय, रॉयल्टी-मुक्त, रद्द न करता येण्याजोगी, गैर-विशेष अधिकार आणि परवाना आणि उप-परवाना देण्याचा अधिकार मंजूर करता (किंवा असे अधिकार असणाऱ्या मालकाची स्पष्ट मंजुरी असल्याची हमी देता). आपण सहमत आहात की आमच्यासह होणाऱ्या आपल्या संप्रेषणांमध्ये कोणत्याही मालकी हक्काच्या कोणत्याही कथित किंवा वास्तविक उल्लंघन किंवा गैरवापरासाठी प्रदात्याविरुद्ध आपल्याकडे कोणताही आधार नसेल.

वापरकर्त्याची जबाबदारी:

आपण हे अवश्य केले पाहिजे:

  • मायगव्ह किंवा सदस्य सेवेवर प्रवेश करण्यासाठी किंवा प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण नैसर्गिक व्यक्ती असले पाहिजेत;
  • मायगव्ह किंवा सदस्य सेवेच्या खात्यावरील इतर कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) प्रवेश किंवा लिंक करू नये किंवा तसे करण्याचा प्रयत्न करू नये;
  • इतर कोणत्याही व्यक्तीला आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरण्याची परवानगी देऊ नये; आपले मायगव्ह खाते युजरनेम, पासवर्ड नेहमी आपल्याकडे ठेवा आणि आपला पासवर्ड इतर कोणालाही सांगू नये;
  • आपल्या मायगव्ह खात्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आली आहे अशी शंका असल्यास ताबडतोब हेल्पडेस्कला कळवा. उदा.: आपला पासवर्ड किंवा युजरनेम हरवला आहे किंवा चोरला गेला आहे. आमच्याशी संपर्क साधा येथे तपशील वापरून मायगव्ह शी संपर्क साधा;
  • आपले वैयक्तिक तपशील (आपले नाव आणि जन्मतारीखासह) अचूक आहेत याची खात्री करा आणि मायगव्ह वर अपडेटेड रहा;
  • आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरून आपल्या मायगव्ह खात्याच्या कोणत्याही वापरासाठी आपण जबाबदार आहात, भलेही आपण अशा वापरास अधिकृत केले असो अथवा नसो.
  • मायगव्ह वरील तपशील केवळ मायगव्ह वेबसाइटद्वारेच आणि केवळ युजरनेम आणि प्रमाणीकरण तपशील वापरुन उपलब्ध असतील जे विशेषत: आपल्याला दिला गेला आहे.

आपण केवळ आपल्याच मायगव्ह खात्याचा वापर केवळ कायदेशीर कारणांसाठी केला पाहिजे आणि कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे मायगव्ह च्या वापरास आणि उपभोगास प्रतिबंधित करणारा किंवा अडथळा निर्माण करणारा किंवा त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारा असू नये. यामध्ये अशी वागणूक जी बेकायदेशीर आहे किंवा जी इतर व्यक्तीला त्रासदायक ठरू शकेल किंवा व्यथित करणारी किंवा गैरसोयीची ठरू शकेल किंवा अश्लील किंवा आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणे किंवा मायगव्ह वर व्यत्यय निर्माण करेल अशा वागणुकीचा समावेश आहे.

आपण मायगव्ह द्वारे कोणतीत्याही बेकायदेशीर, बदनामीकारक, अश्लील, आक्षेपार्ह किंवा निंदनीय सामग्री, किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्र्याया वर्तनास प्रोत्साहन देणारी किंवा प्रोत्साहित करणारी कोणतीही सामग्री पोस्ट किंवा प्रसारित करू नये.

आपण मायगव्ह वर प्रदान केलेली माहिती:

जर आपल्या मायगव्ह खात्यात आपल्याला माहिती पुरवण्यास सांगितले जात असेल तर आपण पुरवलेली माहिती पूर्ण आणि अचूक असणे आवश्यक आहे. आपण कबूल करता की जर आपण अपूर्ण, चुकीची किंवा खोटी माहिती पुरवली, अनधिकृत कार्य करण्यासाठी मायगव्ह चा वापर केला (किंवा करण्याचा प्रयत्न केला), किंवा अन्यथा मायगव्ह चा गैरवापर केला, तर आपला मायगव्ह वरील प्रवेश निलंबित किंवा संपुष्टात आणला जाऊ शकतो.

चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे हा गंभीर गुन्हा आहे. मायगव्ह द्वारे अपूर्ण, चुकीची किंवा खोटी माहिती पुरवणे हे एखाद्या फॉर्मवर किंवा वैयक्तिकरित्या चुकीची माहिती पुरवण्यासारखेच मानले जाईल आणि यामुळे खटला आणि दिवाणी किंवा फौजदारी दंड होऊ शकतो.

कॉपीराईट धोरण:

या वेबसाइटवर वैशिष्ट्यीकृत साहित्य विनामूल्य पुनरुत्पादित केले जाऊ शकते. तथापि, साहित्य अचूकपणे पुनरुत्पादित करणे आवश्यक आहे आणि अपमानास्पद रीतीने किंवा दिशाभूल संदर्भात वापरले जाऊ नये. जिथे जिथे साहित्य प्रकाशित केले जात आहे किंवा इतरांना जारी केले जात आहे, तेथे स्रोत ठळकपणे मान्य करणे आवश्यक आहे. तथापि, या सामग्रीचे पुनरुत्पादन करण्याची परवानगी कोणत्याही सामग्रीपर्यंत वाढविली जाणार नाही जी तृतीय पक्षाची कॉपीराइट (वापरकर्ता सबमिट केलेली सामग्री) म्हणून ओळखली जाते. अशा साहित्य पुनरुत्पादन करण्यासाठी अधिकृतता संबंधित कॉपीराइट धारक प्राप्त करणे आवश्यक आहे.

हायपरलिंकिंग धोरण:

बाह्य वेबसाइट / पोर्टलवरील लिंक्स

मायगव्ह वर अनेक ठिकाणी आपल्याला इतर वेबसाइट्स/पोर्टल्सच्या लिंक्स मिळतील. आपल्या सोयीसाठी या लिंक्स देण्यात आल्या आहेत. लिंक केलेल्या वेबसाइट्सवरील सामग्रीसाठी मायगव्ह जबाबदार असणार नाही आणि त्यात व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या वेबसाइटवर दिलेल्या लिंक किंवा त्याच्या सूचीची केवळ उपस्थिती कोणत्याही प्रकारचे समर्थन म्हणून गृहित धरू नये. या लिंक सर्वकाळ काम करतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि लिंक असलेल्या ठिकाणांच्या उपलब्धतेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.

इतर वेबसाईट्स / पोर्टल्सद्वारे मायगव्ह चे लिंक्स

या वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या माहितीशी आपण थेट दुवा साधण्याविषयी आम्ही कोणताही आक्षेप घेत नाही आणि त्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यक नाही. तथापि, आमची अपेक्षा आहे की आपण या वेबसाइटवर प्रदान केलेल्या कोणत्याही लिंकबद्दल आम्हाला सूचित करा, जेणेकरून त्यात काही बदल किंवा अपडेट केले तर आपल्याला त्या विषयी माहिती दिली जाऊ शकेल. तसेच, आम्ही आमचे पेजेस आपल्या साईटवरील फ्रेममध्ये लोड करण्याची परवानगी देत नाही. मायगव्ह च्या मालकीचे पेजेस वापरकर्त्याच्या नव्याने उघडलेल्या ब्राउझर विंडोमध्ये लोड करणे आवश्यक आहे.

गोपनीयता धोरण

ही वेबसाइट आपली अशी कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती (नाव, फोन नंबर किंवा ई-मेल पत्ता) स्वयंचलितपणे कॅप्चर करत नाही ज्यावरून आपल्याला वैयक्तिकरित्या ओळखता येऊ शकेल. आमच्या वेबसाइटला भेट दिल्यावर जेव्हा आपण आपली वैयक्तिक माहिती जसे की नावे किंवा पत्ते प्रदान करण्याचा पर्याय निवडता, तेव्हा आम्ही केवळ माहितीसाठी आपली विनंती पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करतो. मायगव्ह च्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी आणि सरकारशी संपर्क साधण्यासाठी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गोळा केलेली माहिती परस्परसंवाद सुलभ करण्यासाठी वापरली जाते.

मंत्रालय आणि विभागांच्या सहकार्याने मायगव्ह अनेक प्रश्नमंजुषा, हॅकेथॉन आणि स्पर्धा आयोजित करते. विजेत्यांचे वैयक्तिक तपशील स्पर्धेचे निर्माते / सहयोगी विभागांसह शेअर केले जाऊ शकतात. ओळख पटवता येण्याजोग्या कोणत्याही वैयक्तिक माहितीशिवाय विजेत्यांची नावे मायगव्ह टीम आणि स्पर्धेचे निर्माते / सहयोगी विभाग यांच्याद्वारे इलेक्ट्रॉनिक / प्रिंट मीडियाच्या माध्यमाने सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यासाठी वापरू शकतात.

उताऱ्यात स्पष्ट केल्याप्रमाणे विजेत्यांना वगळता, मायगव्ह या साईटवर स्वेच्छेने दिलेली कोणतीही वैयक्तिक ओळख पटवण्यायोग्य माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला (सार्वजनिक / खाजगी) विकू किंवा शेअर करत नाही. मायगव्ह वर दिलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, बदल किंवा विनाशापासून संरक्षित केली जाईल.

मायगव्ह वापरकर्त्याबद्दल काही माहिती गोळा करते, जसे की, इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्ता, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ आणि भेट दिलेले पेजेस. जोपर्यंत मायगव्ह ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येत नाही तोपर्यंत, मायगव्ह आमच्या साइटला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीशी या पत्त्यांना जोडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.

कुकीज धोरण

कुकी हा सॉफ्टवेअर कोडचा असा भाग आहे जो आपण जेव्हा एखाद्या साईटवरील माहिती पाहता तेव्हा इंटरनेट वेबसाईट आपल्या ब्राउझरला पाठवितो. कुकी वेबसाइट सर्व्हरद्वारे आपल्या संगणकावर किंवा मोबाइल डिव्हाइसवर साध्या टेक्स्ट फाईलच्या स्वरुपात संग्रहित केली जाते आणि केवळ तो सर्व्हर त्या कुकीची सामग्री पुनर्प्राप्त किंवा वाचण्यास सक्षम असेल. कुकीज आपल्याला पेजवर कार्यक्षमतेने नेव्हिगेट करण्यास मदत करतात कारण ते आपली प्राधान्ये संग्रहित करतात आणि सामान्यतः वेबसाईटच्या बाबतीत आपला अनुभव सुधारतात. मायगव्ह आपल्या मायगव्ह सब-डोमेनच्या बाबतीत आपला अनुभव आणि परस्परसंवाद सुधारण्यासाठी खालील प्रकारच्या कुकीज वापरतात:

1. आपण ब्राउझिंग पॅटर्नचा मागोवा ठेवण्यासाठी आपण जेव्हा आमच्या वेबसाईटला भेट देता तेव्हा आपल्या संगणक किंवा मोबाइल डिव्हाइसची अनामिकपणे आठवण ठेवण्यासाठी अ‍ॅनालिटीकल कुकीज.

2. आपली नोंदणी आणि लॉगिन तपशील, सेटिंग्ज प्राधान्ये, आणि आपण पहात असलेल्या पेजेसचा मागोवा ठेवून आमची वेबसाइट कार्यक्षमतेने कार्य करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी सर्व्हिस कुकीज.

3. नॉन-पर्सिस्टंट कुकीज म्हणजेच पर-सेशन कुकीज. पर-सेशन कुकीज तांत्रिक उद्देशांची पूर्तता करतात, जसे की मायगव्ह आणि त्याच्या सब-डोमेनद्वारे अविरत नेव्हिगेशन प्रदान करणे. या कुकीज वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत नाहीत आणि आपण आमच्या वेबसाईटवरून बाहेर पडताच ते डिलीट केले जातात. कुकीज डेटा कायमस्वरूपी रेकॉर्ड करत नाही आणि ते आपल्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हवर संग्रहित केले जात नाहीत. कुकीज मेमरीमध्ये संग्रहित केल्या जातात आणि केवळ सक्रियपणे ब्राउझिंग करताना उपलब्ध असतात. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, आपण आपला ब्राउझर बंद केल्यानंतर, कुकी अदृश्य होते.

तसेच आपल्याला हे देखील लक्षात येईल की जेव्हा आपण मायगव्ह आणि त्याच्या सब-डोमेनला भेट देता आणि जेव्हा आपल्याला लॉग इन करण्यास सूचित केले जाते किंवा जे कस्टमाइज करण्याजोगे आहेत, तेव्हा आपल्याला कुकीज स्वीकारावे लागू शकतात. जर आपण आपल्या ब्राउझरद्वारे कुकीज स्वीकारले नाहीत, तर कदाचित मायगव्ह चे सब-डोमेन योग्यरित्या काम करणार नाही.

या अटी व शर्ती भारतीय कायद्यानुसार शासित केल्या जातील आणि ठरवल्या जातील. या अटी आणि शर्तींच्या अंतर्गत उद्भवणारा कोणताही वाद भारताच्या न्यायालयाच्या विशेष अधिकार क्षेत्राच्या अधीन असेल.