होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मायगव्हशी संलग्न

मायगव्ह शासकीय संस्थांशी संलग्न होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे

26th जुलै, 2014 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनासाठी नागरिकांचा सहभाग मिळवण्यासाठी 'मायगव्ह' या मंचाचा शुभारंभ केला, जो सुराज्याचे ध्येय सामूहिकपणे साध्य करण्यासाठी नागरिकांना, तज्ञांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना एक आश्चर्यकारक संधी सादर करतो.

मायगव्ह या मंचाच्या माध्यमातून नागरिकांशी सहकार्य करण्यासाठी सरकारी संस्थांना सहाय्य करण्यात आतुर आहे.

मायगव्ह प्रामुख्याने सरकारी विभाग आणि संस्थांसाठी त्यांच्या नागरिक सहभाग उपक्रमांचा पाठपुरावा करण्यासाठी तयार केला आहे. संस्था शासनाच्या प्रत्येक विभागातील उपक्रम आणि विविध कारणांवर आधारित आवडीचे समूह तयार करू शकतात किंवा निर्माण करू शकतात.

  • प्रत्येक समूहात, संबंधित आणि महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरू केली जाऊ शकते. या चर्चेमुळे सरकारी संस्थांना नागरिकांची मते जाणून घेण्यास आणि धोरणात्मक मुद्यांवर अभिप्राय गोळा करण्यास मदत होईल.
  • संशोधन कागदपत्रे लिहिणे, संकल्पना नोंदी, क्षेत्र अहवाल, फोटो / व्हिडिओ घेणे, धोरणात्मक उपाययोजनांचे संकलन करणे यासारख्या कार्यांद्वारे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन आणि प्रत्यक्ष जमिनीवरील कामांमध्ये सहभागी केले जाऊ शकते. या कार्यामुळे कल्पनांचे क्राऊड सोर्सिंग तर होईलच पण त्याचप्रमाणे प्रदेशाचे वैशिष्ट्य, क्षेत्राचे वैशिष्ट्य तसेच वैयक्तिक यशोगाथा, सर्वोत्तम कार्य पद्धती आणि / किंवा समस्या समजून घेण्यास मदत होईल.
  • या मंचाचा आणखी एक पैलू म्हणजे क्रिएटिव्ह कॉर्नर आणि खुला मंच, ज्याच्या सहाय्याने संघटना आणि संस्थांना आगामी उपक्रमांवर सर्जनशील माहितीसाठी स्पर्धा आयोजित करण्याची किंवा राष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या एखाद्या विशिष्ट विषय / समस्येवर चर्चा सुरु करण्याची संधी देते .

संभाव्य परिणाम:

  • नागरिकांची मते समजून घेणे आणि अभिप्राय गोळा करणे
  • कामांच्या माध्यमातून लोकांचे विचार आणि त्यांचे योगदान मिळवणे
  • लोकांच्या सहभागाच्या मदतीने प्रकल्पांना यशस्वी करू शकतील अशा प्रतिभा आणि कौशल्य ओळखणे
  • सर्वोत्तम कल्पनांची अंमलबजावणी करणे आणि 'सुशासन' हे ध्येय साध्य करणे

सर्वात शेवटी, लोकसहभागातून प्रशासन मजबूत करण्यासाठी प्रकल्पांना यशस्वी करू शकतील अशा प्रतिभा आणि कौशल्य ओळखण्यात मायगव्ह सरकारी संस्थांना मदत करते.

टेम्पलेट भरा आणि या लोकाभिमुख मंचाच्या माध्यमातून देशाच्या भविष्यातील एक नवा अध्याय लिहा: