होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मायगव्ह - वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मायगव्ह म्हणजे काय

मायगव्ह हा भारताच्या वृद्धी आणि विकासासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिक आणि सरकार यांच्यात भागीदारी निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेला अभिनव मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून, नागरिकांच्या विचार, सूचना आणि प्रत्यक्ष भूस्तरीय योगदानाची मागणी करून सुशासनाच्या दिशेने नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. राष्ट्र निर्मितीच्या या अनोख्या उपक्रमात नागरिक सहभागी होऊ शकतात. या देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण भारतातील नागरिक एकत्र येऊन विविध धोरणे, कार्यक्रम, योजना या संदर्भात आपले तज्ज्ञ विचार, कल्पना आणि सूचना सरकारला कळविणार आहेत. सरकारसोबत मिळून काम करण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे हे मायगव्ह चे उद्दिष्ट आहे.

मी मायगव्ह मध्ये कसा सहभागी होऊ शकतो

सहभागी होण्यासाठी https://www.mygov.in वर नोंदणी करा. आपल्याला नाव, ईमेल ID इत्यादी वैयक्तिक तपशील विचारले जातील. आपल्याकडे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे आणि कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती पुरवायला आवडेल याचाही उल्लेख करावा लागेल.

कृपया लक्षात ठेवा की मायगव्ह या साईटवर स्वेच्छेने देण्यात आलेली कोणतीही वैयक्तिक ओळख पटवण्याजोगी माहिती कोणत्याही तृतीय पक्षासोबत (सार्वजनिक/खाजगी) शेअर करत नाही. या वेबसाइटवर प्रदान केलेली कोणतीही माहिती हानी, गैरवापर, अनधिकृत प्रवेश, प्रकटीकरण, बदल किंवा विनाशापासून संरक्षित केली जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी

जर आपण @gov.in किंवा @nic.in ईमेल ID असणारे सरकारी कर्मचारी असाल तर, आपण इतर कोणतेही तपशील प्रदान न करता लॉग इन करण्यासाठी यांचा वापर करू शकता ..

जनतेसाठी

मोठ्या प्रमाणातील जनतेसाठी, आपल्या वैध ईमेल ID आणि आपल्या 10 अंकी मोबाइल नंबरव्हा मदतीने आपण मायगव्ह वर नोंदणी आणि साइन अप करू शकता. लॉग इन करताना, नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल ID चा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID प्रविष्ट कराल, तेव्हा एक वन टाइम पासवर्ड (OTP) मायगव्ह वर नोंदणीकृत आपल्या ईमेलवर तसेच मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. लॉग इन करण्यासाठी आपल्याला कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. वैकल्पिकरित्या, आपण आपला ईमेल ID आणि पासवर्ड वापरून साइन-इन करू शकता जो आपण मायगव्ह वर जपून ठेवता.

सहभागाच्या पद्धती कोणत्या आहेत?

या मंचावर विविध लक्ष केंद्रित करणारे गट आहेत जिथे नागरिक कार्य (ऑनलाइन आणि प्रत्यक्ष जमिनीवर दोन्ही) करू शकतात तसेच विशिष्ट गटाशी संबंधित विविध कार्ये, चर्चा, मतदान, स्न्भाष्ण आणि ब्लॉगद्वारे त्यांचे विचार शेअर करू शकतात.

गट: सरकारशी सहकार्य करा!

सार्वजनिक आणि राष्ट्रीय महत्वाच्या अनेक विषयांमधून एक विषय शोधा आणि निवडा ज्यावर सरकार आणि संबंधित एजन्सी आपले मत जाणून घेण्यास आवडेल. स्वतःला या गटांचा भाग बनवा आणि या मुद्यांवर आपली मोलाची मते आणि प्रस्ताव व्यक्त करा. पोर्टलवरील गटाचा विषय म्हणून उल्लेख केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आपल्याकडून सक्रिय सहभागाची अपेक्षा करेल. एखादा नागरिक एका वेळेस फक्त 4 गटांमध्ये सहभागी होऊ शकतो.

चर्चा करा: स्वतःला व्यक्त करा

मायगव्ह वरील विषय आधारित चर्चेमध्ये आपली मौल्यवान विचार आणि मते व्यक्त करा. हे आपल्या मतांना महत्व देते आणि सरकार आपल्या धोरणात्मक उपक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपली मते जाणून घेण्यास उत्सुक आहे. म्हणूनच, चर्चेत सहभागी व्हा आणि धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे योगदान द्या.

करा: देश उभारणीसाठी आपला वेळ खर्च करा!

प्रशासन प्रक्रियेत सक्रिय भागधारक व्हा. केवळ याच्या निर्मितीमध्येच सहभागी न होता याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये देखील सहभागी व्हा. मायगव्ह पोर्टलच्या माध्यमातून सरकार आपल्याला या कार्यासाठी निर्धारित केलेल्या गट आधारित आणि वैयक्तिक कार्यांद्वारे सरकारच्या धोरण अंमलबजावणी मोहिमेत सहभागी होण्याची संधी प्रदान करते. आपल्या वैयक्तिक कृतीद्वारे याची धोरणात्मक उद्दिष्टे आणि अंमलबजावणी पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारला मदत करा.

एखाद्या कामाची यशस्वी पूर्तता झाल्यास नागरिकांना क्रेडिट पॉईंट्स मिळू शकतात आणि भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याशी आपल्या कल्पना शेअर करण्याची संधी मिळू शकते.

ब्लॉग: अपडेट रहा आणि मायगव्ह च्या महत्वाच्या उपक्रमांना चुकवू नका

मायगव्ह ब्लॉग हे या पोर्टलचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे आपल्याला मायगव्ह पोर्टलवरील सरकारच्या उपक्रम आणि क्रियाकलापांबाबत अपडेट राहण्यास मदत करते. हे आपल्याला सध्याच्या ज्वलंत समस्यांबाबत एक चांगली कल्पना प्रदान करते ज्यामुळे आपण या पोर्टलद्वारे आपल्या कोणत्या समस्येस अधिक प्राधान्य दिले पाहिजे हे ठरवण्यास मदत करते.

चर्चा करा: संपर्कात रहा!

मायगव्ह पोर्टल आपल्याला लाईव्ह चॅटच्या माध्यमातून सरकारी प्रतिनिधींशी संपर्क साधण्याची आणि संवाद करण्याची संधी देखील देते. हे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ज्याच्या सहाय्याने आपण आपली मते आणि कल्पना यांची तत्काळ देवाणघेवाण करू शकता. त्याचबरोबर सरकारी संस्थांना नागरिकांचे शिक्षण आणि त्यांचे उपक्रम पुढे नेण्यासाठी थेट दुवा देखील प्रदान करते.

मतदान: आपल्याला काय वाटते ते आम्हाला सांगा!

मायगव्ह मतदान पोल नागरिकांना ऑनलाइन पोल्सद्वारे विशिष्ट धोरणात्मक मुद्द्यांवर आपले मत मांडण्याचा अधिकार देतात आणि सरकारला त्याच्या धोरणात्मक उपक्रमांचा प्रभावीपणा आणि स्वीकृती याबद्दल एक चांगली कल्पना देते. तसेच जनमताचा मान राखून सरकारला निर्णय घेण्यात मदत करते. हे एक प्रभावी साधन आहे जे नागरिकांना निर्णय प्रक्रियेत थेट योगदान देण्याची संधी देते.

मी सहभाग का घ्यावा?

सहभागी प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभाग मिळवण्यासाठी मायगव्ह हे एक अद्वितीय व्यासपीठ आहे. मायगव्ह वर नोंदणी करून, चर्चेद्वारे सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते आणि कल्पना मांडण्याची संधी आपल्याला मिळते आणि तसेच या पोर्टलवर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जी कामे निश्चित करण्यात आली आहेत, त्या कामांमध्ये थेट सहभागी होण्याची संधी देखील आपल्याला मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे, मायगव्ह आपल्याला सार्वजनिक हिताच्या दिशेने विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यास सक्षम करते आणि सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांवर आपण आपले मत मांडू शकतात. 'मायगव्ह' आपल्याला परिवर्तनाचा घटक बनवते आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रवासात आणि 'सुराज्य' प्राप्त करण्याच्या दिशेने योगदान देण्याची सुवर्ण संधी देते.

सहभागी होण्याचे फायदे काय आहेत?

चर्चांवर मते पोस्ट करून, आपण स्वयंसेवा प्रदान करत असलेली कार्ये पूर्ण करून आणि सोशल मीडियावर कल्पना आणि दृष्टिकोन शेअर करून क्रेडिट पॉइंट मिळवा. मायगव्ह आपल्या विविध वैशिष्ट्यांद्वारे आणि उपक्रमांद्वारे आपल्याला नियमितपणे सरकारशी जोडण्यासाठी आणि धोरण निर्मिती व प्रशासनात योगदान देण्यासाठी एक रेडीमेड इंटरफेस प्रदान करते. क्रेडिट पॉईंट्सवर आधारित प्रोत्साहनाची घोषणा भविष्यात केली जाईल. कालांतराने, निवडक स्वयंसेवक / कार्यकर्ते थेट मंत्र्यांना आणि / किंवा भारताच्या माननीय पंतप्रधानांना देखील भेटू शकतात आणि त्यांची मते सादर करू शकतात.

शिवाय, मायगव्ह आपल्याला सहभागी प्रशासनाचा अविभाज्य भाग बनवून राष्ट्र निर्मितीत मदत करण्याची संधी देते.

मी अयोग्य पोस्ट कशी नोंदवू शकतो?

जर आपल्याला एखादी विशिष्ट पोस्ट किंवा सामग्री अनुचित किंवा अयोग्य स्वरूपाची असल्याची आढळली तर आपण प्रत्येक चर्चा किंवा कार्य पोस्टसह देण्यात आलेल्या असलेल्या स्पॅम बटणावर क्लिक करून विशिष्ट टिप्पणी नोंदवू शकता. एकदा रिपोर्ट केल्यानंतर, सर्व मायगव्ह वापरकर्त्यांमधील पाच जणांनी त्या पोस्टबाबत अयोग्य सामग्रीचा रिपोर्ट केल्यास ती विशिष्ट पोस्ट वेबसाईटवरून काढून टाकली जाईल.

मी अभिप्राय कसा पाठवू शकतो

मायगव्ह मंचाशी संबंधित सामग्री, रचना, सेवा किंवा तांत्रिक समस्यांशी संबंधित सामान्य स्वरूपाचा कोणताही प्रश्न या सानुकूलित अभिप्राय इंटरफेसद्वारे पाठविला जाऊ शकतो.

नोंदणी किंवा लॉग इन संबंधित समस्या येत आहे?

नोंदणी किंवा लॉगिन प्रक्रियेसंदर्भात आपल्याला काही समस्या येत असल्यास, कृपया या फॉर्मद्वारे आमच्याशी संपर्क साधा. मायगव्ह वरील आपल्या सहभागाला आम्ही महत्व देतो म्हणून मायगव्ह वरील ब्राउझिंग आणि/किंवा मायगव्ह द्वारे सहभागी होताना आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आम्हाला अधिक आनंद होईल.

व्यासपीठावर आपल्या सूचना सापडल्या नाहीत?

आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. आम्ही मायगव्ह प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सहभागाला महत्व देतो म्हणून आपल्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करू.

कार्य अभिप्राय

आपण स्वीकारलेल्या कार्यासंदर्भात आपल्याला समस्या येत असल्यास कृपया अभिप्राय फॉर्मद्वारे आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला पुन्हा नक्की संपर्क करू. जर आपल्याकडे समाविष्ट केली जाऊ शकतात अशा कार्यांविषयी काही सूचना असतील किंवा विद्यमान कार्याच्या संदर्भात आम्हाला आपले विचार प्रदान करू इच्छित असल्यास कृपया या अभिप्राय फॉर्मद्वारे आमच्याशी संपर्क साधा.

चर्चा अभिप्राय

आम्हाला चर्चा शृंखलेसंबंधित अभिप्राय प्रदान करण्यासाठी किंवा चर्चा पद्धतीमध्ये आपल्याला येत असलेल्या समस्येबाबत रिपोर्ट करण्यासाठी कृपया या अभिप्राय फॉर्मद्वारे आम्हाला कळवा.

इतर कोणताही मुद्दा

वरील श्रेणी व्यतिरिक्त आपल्याला साईट संबंधित इतर कोणत्याही समस्या येत असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. आपल्याला जी समस्या येत आहे त्याबाबत थोडक्यात वर्णन करून आम्हाला आपल्या समस्येबद्दल कळवा. आम्ही आपल्याला पुन्हा संपर्क नक्की करू.

आपल्याला मायगव्ह शी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही विशिष्ट सामग्रीशी संबंधित आणि मायगव्ह शी संबंधित नसलेल्या कोणत्याही मंत्रालय / विभाग / सरकारी संस्थेशी संबंधित आपला अभिप्राय किंवा प्रश्न सबमिट करायचे असल्यास, कृपया संबंधित मंत्रालय / विभाग / सरकारी संस्थेशी थेट संपर्क साधा किंवा त्यांच्या संबंधित वेबसाइटला भेट द्या. मायगव्ह अशा प्रश्नांना/समस्यांविषयी प्रतिसाद देणार नाही.