होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

उमंगच्या 6 वर्षांसाठी रील मेकिंग स्पर्धा

उमंगच्या 6 वर्षांसाठी रील मेकिंग स्पर्धा
प्रारंभ तारीख :
Nov 08, 2023
शेवटची तारीख :
Dec 25, 2023
18:15 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) उमंगच्या (युनिफाइड मोबाईल प्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रील-मेकिंग स्पर्धेचे आयोजन करत आहे. ...

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) उमंगच्या (युनिफाइड मोबाईल प्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रील-मेकिंग स्पर्धेचे आयोजन करत आहे..

या रीलमधून उमंग ॲप्सची वैशिष्ट्ये आणि / किंवा भारतीय नागरिकांना होणारे फायदे अधोरेखित केले पाहिजेत. कोणत्याही आक्षेपार्ह शब्दांचा किंवा अपमानजनक आशयाचा (राजकीय/धार्मिक/अनुचित अपशब्द) वापर न करता शक्य तितक्या प्रकारे सर्जनशील होण्यासाठी तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करू शकता.

खालीलपैकी एक विषय स्पर्धेसाठी व्यापक थीम म्हणून वापरला जाऊ शकतोः
1. How UMANG has made citizens’ life easy & simple.
2. डिजिटल इंडियाच्या युगात उमंग प्लॅटफॉर्मची प्रासंगिकता
3. उमंग ॲप वापरण्याचे विविध फायदे सांगा
4. उमंग ॲपच्या वापरामुळे तुमच्या आयुष्यात कोणता बदल घडून आला आहे? त्याचे फायदे अधोरेखित करा
5. उमंग ॲपला सुपर ॲप का म्हटले पाहिजे? आपले विचार शेअर करा
6. उमंग ॲप वापरण्याचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर करा आणि आपल्या आवडत्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती द्या.

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत 'उमंग' हा एक महत्वाचा उपक्रम असून, याद्वारे एकाच ठिकाणी सरकारी सेवा उपलब्ध करून दिली जाते. हे एक मास्टर ॲप्लिकेशन म्हणून कार्य करते आणि कृषी, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण इत्यादी विविध क्षेत्रांतील सेवा एकत्रित करते व वापरकर्त्यांना केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक संस्था आणि त्यांच्या एजन्सींकडून ई-सेवा मिळवण्यास सक्षम करते.

उमंगने 'मोबाईल फर्स्ट' धोरणाद्वारे वापरकर्त्यांना केवळ बोटांच्या आधारे शासकीय कामे करणे सुलभ केले आहे. भारतातील जलद गतीने मोबाइल प्रशासन आणि एकाधिक मोबाइल ॲप्सचे व्यवस्थापन करण्यात वापरकर्त्यां होणारीची गैरसोय दूर करण्यासाठी हे बहुभाषिक ॲप विकसित केले गेले असून NeGD, MeitY द्वारे हे ऑपरेट केले जाते.

उमंगच्या 6 वर्षपूर्तीनिमित्त, NeGD ने मायगव्हच्या सहकार्याने, डिजिटल भारताची मोहीम आणि मूल्ये अंतर्भूत करून 'उमंग' प्लॅटफॉर्मचे महत्त्व सांगणारा एक उत्सवी संदेश देणारा योग्य व्हिडिओ (रीलच्या स्वरुपात) बनवण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

बक्षिसे:
विजेत्या प्रवेशिकांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
1st Prize- Rs. 15,000/-
2nd Prize- Rs. 12,000/-
3rd Prize- Rs. 10,000/-

7 उत्तेजनार्थ पुरस्कार: रु. 2000/- प्रत्येकी

सादर स्वरूप:
जास्तीत जास्त 90 सेकंडच पोर्ट्रेट-मोडमधील MP4 व्हिडिओ.

टीप: Participants can paste the video link in the Word/PDF file or directly share in the comments section below. Videos uploaded on a social media platform can also be shared.

इथे क्लिक करा for Terms and Conditions.pdf (120.88 KB)

या टास्क अंतर्गत सादर
1125
एकूण
0
मंजूर
1125
आढावा अंतर्गत
Reset