होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर वाला घर आर्ट स्पर्धा

पंतप्रधान  सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर वाला घर आर्ट स्पर्धा
प्रारंभ तारीख :
Mar 11, 2024
शेवटची तारीख :
Mar 15, 2024
18:00 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश ...

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर (RTS) कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात सौर ऊर्जेच्या वापराचे एकत्रीकरण हा पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश आहे. एक कोटी कुटुंबांना सामावून घेण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असलेल्या या योजनेमुळे लाभार्थ्यांना सौर पॅनलच्या माध्यमातून दरमहा 300 युनिटपर्यंत वीजनिर्मिती करता येणार आहे. लाभार्थ्यांना ₹78000 पर्यंतच्या सबसिडीचाही लाभ घेता येणार आहे.

योजनेबद्दल जनजागृती करण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि REC लिमिटेड सहकार्याने मायगव्ह आयोजन करत आहेत पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर वाला घर आर्ट स्पर्धा. सौरऊर्जा आणि त्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारी आपली अनोखी कलाकृती सादर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. या सबमिशनमध्ये सौर पॅनलसह घरे दर्शविणारे मातीचे बनलेले मॉडेल आणि प्रकल्प समाविष्ट केले जाऊ शकतात. सहभागी लक्षवेधी कलाकृती तयार करण्यासाठी होईल तितकी सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वापरू शकतात.

तांत्रिक मापदंड:
1. कलाकृती / मॉडेलने स्पर्धेच्या थीमचे पालन करणे आवश्यक आहे.
2. सहभागींना .JPG स्वरूपात आपल्या प्रकल्पाचे उच्च क्वालिटीचे फोटो सबमिट करावे लागतील.
3. सहभागींनी त्यांच्या कलाकृती, मॉडेलचे तपशील आणि प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांचे वर्णन करणारे एक संक्षिप्त लेखन सबमिट करणे आवश्यक आहे (अंदाजे 200 शब्द).

बक्षिसे:
1. सर्वोत्कृष्ट कलाकृतीला रु. 15,000 रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

इथे क्लिक करा नियम व अटींसाठी.pdf(116 KB)

या टास्क अंतर्गत सादर
57
एकूण
0
मंजूर
57
आढावा अंतर्गत