होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना जिंगल स्पर्धा

पंतप्रधान  सूर्य घर मुफ्त बिजली योजना जिंगल स्पर्धा
प्रारंभ तारीख :
Mar 11, 2024
शेवटची तारीख :
Mar 15, 2024
08:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश ...

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर (RTS) कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात सौर ऊर्जेच्या वापराचे एकत्रीकरण  हा पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश आहे. एक कोटी कुटुंबांना सामावून घेण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असलेल्या या योजनेमुळे लाभार्थ्यांना सौर पॅनलच्या माध्यमातून दरमहा 300 युनिटपर्यंत वीजनिर्मिती करता येणार आहे. लाभार्थ्यांना ₹78000 पर्यंतच्या सबसिडीचाही लाभ घेता येणार आहे.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय , च्या सहकार्याने मायगव्ह अंतर्गत पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना जिंगल स्पर्धा सौर तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींच्या एकत्रीकरणाच्या संकल्पनेवर आधारित जिंगल तयार करून आपली सर्जनशीलता आणि संगीत कौशल्य दाखवण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करत आहे.

तांत्रिक मापदंड:
1. जिंगल क्रिस्प आणि आकर्षक असणे आवश्यक आहे.
2. कृपया mp3 स्वरूपातील जिंगल PDF स्वरूपातील शब्दांसह सबमिट करा.
3. जिंगलमधील ओळींची एकूण संख्या 6 (अंदाजे 200 शब्द) पेक्षा जास्त असू शकत नाही. ओळ किंवा शब्द मर्यादा ओलांडल्यास त्वरित अपात्र ठरविले जाईल.
4. शब्द केवळ इंग्रजी किंवा हिंदीमध्ये असू शकतात.
5. फॉन्ट प्रकार टाइम्स न्यू रोमन आणि फॉन्ट साइज- 12. निर्धारित फॉन्ट शैलीचे पालन न केल्यास अपात्र ठरविले जाईल.

बक्षिसे:
1. सर्वोत्तम प्रवेशिकेला रु 15,000 रोख पारितोषिक मिळणार आहे.

इथे क्लिक करा नियम व अटींसाठी.pdf(118 KB).

या टास्क अंतर्गत सादर
166
एकूण
0
मंजूर
166
आढावा अंतर्गत