होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मिलेट्स मॅजिक-आपल्या पाककृती शेअर करा स्पर्धा

मिलेट्स मॅजिक-आपल्या पाककृती शेअर करा स्पर्धा
सुरुवातीची तारीख:
Oct 25, 2022
शेवटची तारीख:
Dec 25, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result सबमिशन बंद झाले

मिलेट्स हा लहान बी असलेले वार्षिक गवताचा एकत्रित समूह आहे आणि हे प्रामुख्याने समशीतोष्ण, उपउष्णकटिबंधीय आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशातील कोरड्या भागातील किरकोळ जमिनीवर ....

मिलेट्स हा लहान बी असलेले वार्षिक गवताचा एकत्रित समूह आहे आणि हे प्रामुख्याने समशीतोष्ण, उपउष्णकटिबंधीय आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशातील कोरड्या भागातील किरकोळ जमिनीवर धान्याचे पीक म्हणून घेतले जातात. हवामानस तोंड देणारे मिलेट्सचे पीक 131 देशांमध्ये घेतले जाते. हे एक प्राचीन धान्य आहे आणि अन्नासाठी लागवड केली जाणारी पहिली वनस्पती आहे, ज्याचा सर्वात जुना पुरावा इ. स. पू. 3000 पूर्वीच्या सिंधू संस्कृतीमध्ये आढळतो. आशिया आणि आफ्रिकेतील 59 कोटी लोकांसाठी मिलेट्स हे पारंपरिक अन्न आहे.

मिलेट्स ही भरड धान्ये आहेत आणि प्रथिने, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे भांडार आहेत. त्यामध्ये सॉर्गम (ज्वारी), पर्ल मिलेट (बाजरी), फिंगर मिलेट (नाचणी/मंडुआ) आणि स्मॉल मिलेट म्हणजे छोटी बाजरी (कुटकी), कोडो मिलेट (कोडो), बार्नयार्ड मिलेट (सावा/झंगोरा), फोक्सटेल मिलेट (कंगनी/काकुन), प्रोसो मिलेट (चीना) यांचा समावेश असून ही सर्व धान्ये मिलेट्सच्या गटात येतात ज्यांना त्यांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे आता 'न्यूट्रीटी-सीरियल्स' असे म्हणतात.

मिलेट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष-2023

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने भारताने प्रायोजित केल्यानंतर आणि 70 हून अधिक देशांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर ठराव पास करून 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले. मिलेट्सच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीत लागवडीसाठी त्यांची उपयुक्तता या विषयी जागरूकता निर्माण करणे हा या ठरावाचा उद्देश आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष-2023 च्या समारंभासाठी नोडल मंत्रालय असेल. या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मोहिमांच्या माध्यमातून जोरदार प्रसिद्धी देण्यासाठी भारत आता पुढाकार घेत आहे.

मायगव्ह आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मिलेट्सच्या पाककृतींचे लहान व्हिडीओ मागवण्यासाठी एका पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Technical Parameter
a. Short millets recipe in video format only and provide the link of the video in description box.
b. Duration of the recipe should be 5-10 minutes.
c. Winner shall be required to provide the millets recipe in DVD/Pendrive/email after the declaration.
d. The millets recipe should be usable on every platform of government organization like Radio, TV, Conference, Seminar, Mela etc.

सादर करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2022 आहे

इथे क्लिक करा for Terms and Condition (PDF 105KB)

SUBMISSIONS UNDER THIS TASK
413
Total
0
Approved
413
Under Review
Reset