होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

Logo Design Competition for Bharat Parv 2023

Logo Design Competition for Bharat Parv 2023
सुरुवातीची तारीख:
Dec 14, 2022
शेवटची तारीख:
Jan 03, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून 26 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथावर भारत सरकारतर्फे भारत पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे...

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून 26 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथावर भारत सरकारतर्फे भारत पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात फूड फेस्टिव्हल, हस्तकला मेळा, लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरण, सांस्कृतिक मंडळांचे सादरीकरण, सर्व्हिस बँड कॉन्सर्ट, प्रजासत्ताक दिनाच्या देखाव्यांचे प्रदर्शन, लाल किल्ल्याची रोषणाई इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

भारत पर्व 2023 या कार्यक्रमासाठी मायगव्ह प्लॅटफॉर्मवर लोगो डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

देखो अपना देश, एक भारत श्रेष्ठ भारत, G20 आणि मिशन लाईफ यांचे ब्रँडिंग आणि प्रमोशन या कार्यक्रमात केले जाणार आहे. संपूर्ण भारत पर्व झोन सिंगल यूज प्लास्टिकमुक्त क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येणार आहे.

Ministry of Tourism has been designated as the nodal Ministry for the event, the highlights of which include showcasing of the best Republic Day Parade tableaux at the venue, performances by the 3-Armed Forces bands (static and moving), cultural performances by the Zonal Cultural Centres as well as cultural troupes from States/ UTs, a pan – India Food Court with 60 food stalls and a pan – India Crafts Bazaar with 65 handicraft stalls..

भारत पर्वाचे उद्घाटन 26 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून 26 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आणि 27 ते 31 जानेवारी 2023 या काळात दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Technical Parameters

सहभागींनी फक्त JPEG / JPG / PNG स्वरूपात लोगो अपलोड केला पाहिजे.
लोगोची रचना डिजिटल प्लॅटफॉर्मवर केलेली असली पाहिजे. स्पर्धेच्या विजेत्याला एडिट करण्यायोग्य आणि ओपन फाइल स्वरूपात डिझाइन सादर करणे आवश्यक असेल. सहभागींनी मूळ डिझाईन्स सादर केल्याची खात्री करून घ्यावी.
प्रत्येक प्रवेशिकेसोबत रचना केलेल्या लोगोसंबंधी तर्कसंगत आणि सर्जनशील विचारांचे (100 पेक्षा जास्त शब्द नाही) सविस्तर तर्कशास्त्र आणि स्पष्टीकरण सॉफ्ट कॉपीमध्ये सादर केले पाहिजे.
लोगो रंगीत स्वरूपात डिझाइन केला पाहिजे. लोगोचा आकार पोर्ट्रेट किंवा लँडस्केप मोडमध्ये 5cm * 5cm ते 30cm * 30cm असू शकतो.
हा लोगो ट्विटर/ फेसबुकसारख्या वेबसाईट/ सोशल मीडियावर, प्रेस प्रकाशन आणि अशा मुद्रणयोग्य स्टेशनरी, संकेत, लेबल इत्यादींवर, मासिके, व्यावसायिक, होल्डिंग्स, स्टॅण्डीज, ब्रोशर्स, लीफलेट्स, पॅम्फलेट, भारत पर्वाच्या प्रचारासाठी स्मरणिका आणि इतर प्रसिद्धी आणि विपणन साहित्य यांच्यावर वापरता येणारा असावा.
लोगोची इमेज किमान 300 DPI च्या उच्च रिझोल्यूशनची असावी.
स्क्रीनवर 100% वर लोगो स्वच्छ दिसला पाहिजे (पिक्सलेट किंवा बिट-मॅप्ड नाही).
प्रवेशिका कम्प्रेस्ड किंवा सेल्फ-एक्स्ट्रॅक्टिंग स्वरूपात सादर करू नये.
लोगो डिझाइन इम्प्रिंटेड किंवा वॉटरमार्क करू नये.

Gratification

खालील प्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अशी तीन पारितोषिके असणार आहेत: - (परिणाम जाहीर झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ती स्वीकारली पाहिजेत)
(a) प्रथम बक्षीस 3 रात्री -4 दिवसांची सिक्कीमची टूर (जेवण व आवास + स्थळदर्शन)** विजेता अधिक एक यांच्यासाठी
(b) द्वितीय बक्षीस 3 रात्री - 4 दिवस चेन्नई आणि पुंडूचेरीची टूर (आवास + स्थळदर्शन)** विजेता अधिक एक यांच्यासाठी
(c) तृतीय बक्षीस 2 रात्री-3 दिवस अजमेर-पुष्करची टूर (आवास + स्थळदर्शन)** विजेता अधिक एक यांच्यासाठी

सादर करण्याची अंतिम तारीख 3 जानेवारी, 2023 आहे.

येथे क्लिक करा for Terms & Conditions - PDF (96.6 KB)

SUBMISSIONS UNDER THIS TASK
921
Total
0
Approved
921
Under Review
Reset