होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मायगव्हवर चांद्रयान 3 महाक्विझमध्ये सामील व्हा आणि रु. 6.25 लाखापर्यंत जिंका

मायगव्हवर चांद्रयान 3 महाक्विझमध्ये सामील व्हा आणि रु. 6.25 लाखापर्यंत जिंका
सुरुवातीची तारीख:
Sep 01, 2023
शेवटची तारीख:
Oct 31, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

ISROच्या टीमचे आणि देशातील 140 कोटी लोकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "भारत आता चंद्रावर आहे!" 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चे चंद्रावर निर्विघ्न लँडिंग झाले...

ISROच्या टीमचे आणि देशातील 140 कोटी लोकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "भारत आता चंद्रावर आहे!"

23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चे चंद्रावर निर्विघ्न लँडिंग झाले आणि हा महत्त्वपूर्ण प्रसंग संपूर्ण जगाने पाहिला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या अगदी जवळ पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

चांद्रयान 3 च्या लँडिंगचे यश हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि त्याच्या टीमचे असामान्य समर्पण आणि अढळ निर्धार यांचे द्योतक आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), मायगव्हच्या सहकार्याने, भारताच्या आश्चर्यकारक अंतराळ संशोधन प्रवासाचा सन्मान करण्यासाठी, चंद्राबद्दलच्या चमत्कारिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि विज्ञान व शोध या विषयीचे आपले प्रेम प्रदर्शित करण्यासाठी चांद्रयान 3 महाक्वीजमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करत आहे.

चांद्रयान 3 महाक्विझमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना मायगव्हवर वैयक्तिक खाते तयार करावे लागणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल, जे डाउनलोड करता येऊ शकेल आणि या क्विझच्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील.

आपण सर्व मिळून भारताच्या चंद्रपथच्या प्रवासाला हातभार लावूया!

या टास्क अंतर्गत सादर