होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

उष्णतेच्या लाटेसाठी माझी तयारी या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

उष्णतेच्या लाटेसाठी माझी तयारी या विषयावर निबंध लेखन स्पर्धा
प्रारंभ तारीख :
May 08, 2024
शेवटची तारीख :
May 22, 2024
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) मायगव्हच्या सहकार्याने नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी निबंध लेखन स्पर्धेसाठी सर्व वयोगटांचे विद्यार्थी/ नागरिकांना आमंत्रित करत आहे...

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), सहकार्याने मायगव्ह , निबंध लेखन स्पर्धेसाठी सर्व वयोगटांचे विद्यार्थी/नागरिकांना आमंत्रित करत आहे जेणेकरून उष्णतेच्या लाटेसाठी नागरिक कसे तयार आहेत याबद्दल त्यांच्या कल्पना शारेर करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल.

अलीकडच्या काळात देशभरात उष्णतेच्या लाटेची वारंवारता, कालावधी आणि तीव्रता लक्षणीय वाढली आहे. ज्या राज्यांमध्ये हे घडण्याची कमी शक्यता मानली जात होती, तेथेही उष्णतेच्या लाटेच्या घटना घडल्या आहेत. उष्णतेची लाट आणि आपत्तीचा धोका कसा कमी होतो याबद्दल जनजागृती करून लोकांना कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.

तुमच्या सर्जनशीलतेला साद घाला आणि तुमचे विचार आणि ज्ञान प्रदर्शित करा. उष्णतेच्या लाटेचे ज्ञान आणि त्याची तयारी याआधारे निबंधांचे मूल्यमापन केले जाईल. निबंध 1000 शब्दांच्या मर्यादेची पूर्तता करणारे असावेत आणि pdf स्वरूपात असावेत.

या निबंधलेखन स्पर्धेची थीम आहे “My Preparedness for Heat Wave / ग्रीष्म लहर (लू) के लिए मेरी तैयारी”

पारितोषिके
- प्रथम पारितोषिक: रु.10,000/-
- द्वितीय पारितोषिक: रु.5000/-
- तृतीय पारितोषिक: रु.3000/-
- प्रत्येकी रु.1000/- ची 3 उत्तेजनार्थ पारितोषिके.

इथे क्लिक करा नियम आणि अटी वाचण्यासाठी (PDF: 33KB)

या टास्क अंतर्गत सादर
1043
एकूण
99
मंजूर
944
आढावा अंतर्गत
Reset