होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी एक मस्कॉट डिझाइन करा स्पर्धा

पंतप्रधान  सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी एक मस्कॉट डिझाइन करा स्पर्धा
प्रारंभ तारीख :
Mar 11, 2024
शेवटची तारीख :
Mar 15, 2024
18:00 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश ...

प्राचीन काळापासून आपल्या ग्रहाला जीवन देणारा म्हणून सूर्याची पूजा केली जाते. भारतात सौरऊर्जेची अफाट क्षमता आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर (RTS) कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात सौर ऊर्जेच्या वापराचे एकत्रीकरण  हा पंतप्रधान सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेचा उद्देश आहे. एक कोटी कुटुंबांना सामावून घेण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असलेल्या या योजनेमुळे लाभार्थ्यांना सौर पॅनलच्या माध्यमातून दरमहा 300 युनिटपर्यंत वीजनिर्मिती करता येणार आहे. लाभार्थ्यांना ₹78000 पर्यंतच्या सबसिडीचाही लाभ घेता येणार आहे.

या योजनेला प्रोत्साहन देत, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय , च्या सहकार्याने मायगव्ह PM सूर्यघर: मुफ्त बिजली योजनेसाठी मस्कॉट डिझाईन करण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करत आहे ज्यामध्ये या योजनेचा चेहरा बनण्याची ताकद आहे. सौरऊर्जेचा आणि हरित ऊर्जेचा सर्वसाधारणपणे अवलंब करण्याचे महत्त्व या मस्कॉटमध्ये ठामपणे मांडले गेले पाहिजे.

तांत्रिक मापदंड:
1. मस्कॉट लक्षवेधी आणि या योजनेच्या फायद्यांसह बारीकसारीक कल्पना दर्शविणारा असणे आवश्यक आहे.
2. प्रवेशिकांमध्ये मस्कॉटचे संक्षिप्त वर्णन आणि ते योजनेचे सार कसे उत्तम प्रकारे समाविष्ट करते हे जोडलेले असावे.
3. प्रवेशिका केवळ उच्च गुणवत्तेच्या .JPEG स्वरूपात स्वीकारल्या जातील. इतर कोणत्याही स्वरूपात पाठविलेल्या प्रवेशिका त्वरित अपात्र ठरविल्या जातील.

बक्षिसे:
4. सर्वोत्कृष्ट मस्कॉटला रु. 15,000 रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

इथे क्लिक करा नियम व अटींसाठी.pdf(120 KB)

या टास्क अंतर्गत सादर
102
एकूण
0
मंजूर
102
आढावा अंतर्गत
Reset