होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई)

या ग्रुपमधील अ‍ॅक्टिव्हिटीज
तयार केले : 14/09/2016
वरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्र गेल्या पाच दशकांत भारतीय अर्थव्यवस्थेमधील अत्यंत चैतन्यशील आणि गतिमान क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. MSME मोठ्या उद्योगांपेक्षा तुलनेने कमी भांडवली खर्चात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावते, तसेच ग्रामीण आणि मागास क्षेत्रांच्या औद्योगिकीकरणातही मदत करतात; आणि त्याद्वारे, प्रादेशिक असमतोल कमी करणे, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीचे अधिक समान वितरण करण्याचे आश्वासन देते. MSME हे मोठ्या उद्योगांसाठी पूरक घटक आहेत आणि हे क्षेत्र देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठे योगदान देतात.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (M/o MSME) एक चैतन्यशील MSME क्षेत्राची कल्पना करते, ज्यामध्ये संबंधित मंत्रालय / विभाग, राज्य सरकारे आणि इतर भागधारक यांच्या सहकार्याने विद्यमान उद्योगांना सहाय्य पुरवून आणि नवीन उद्योगांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देऊन, खादी, गाव आणि कॉयर उद्योगासह MSME क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन दिले जाते.

कार्य, चर्चा, मतदान, ब्लॉग आणि संभाषण याद्वारे नागरिकांशी चर्चा करणे हा या गटाचा उद्देश आहे.

Website of the ministry - https://msme.gov.in/
Facebook - https://www.facebook.com/minmsme
Twitter - https://twitter.com/minmsme
MyMSME Page - https://my.msme.gov.in/MyMsme/Reg/Home.aspx