होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

कंपनी व्यवहार मंत्रालय

या ग्रुपमधील अ‍ॅक्टिव्हिटीज
तयार केले : 19/01/2017
वरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

मंत्रालय प्रामुख्याने कंपनी कायदा 2013, कंपनी कायदा 1956, मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, 2008 आणि इतर संलग्न कायदे आणि प्रामुख्याने कायद्यानुसार कॉर्पोरेट क्षेत्रातील कामकाजाचे नियमन करण्यासाठी तयार केलेल्या नियम आणि नियमन यांच्या प्रशासनाशी संबंधित आहे.

स्पर्धा कायदा, 2002 याच्या प्रशासनाची जबाबदारीही मंत्रालयावर आहे. हा कायदा स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या प्रथा रोखण्यासाठी, बाजारपेठांमध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देणे आणि टिकवणे, कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे यासाठी आहे.

याशिवाय, ते तीन व्यावसायिक संस्थांवर देखरेख ठेवते, त्या म्हणजे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI). या संस्था संबंधित व्यवसायांच्या योग्य आणि सुव्यवस्थित वाढीसाठी संसदेच्या तीन स्वतंत्र कायद्यांअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

भागीदारी कायदा 1932, कंपनी (राष्ट्रीय निधीला देणगी) कायदा 1951 आणि सोसायटी नोंदणी कायदा 1980 च्या प्रशासनाशी संबंधित केंद्र सरकारची कामे करण्याची जबाबदारीही या मंत्रालयावर आहे.