होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

राष्ट्रीय पर्यटन दिन 2022

बॅनर

परिचय

पर्यटन मंत्रालय, भारत सरकार दि 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करत आहे, 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 75 आठवड्यांच्या भव्य सोहळ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भव्य ठिकाणांमुळे जगभरात भारताचे स्थान उल्लेखनीय आहे. भारताला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा लाभला असून तो अनेक परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. आपल्या देशातील विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी, राष्ट्रीय पर्यटन दिन दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाच्या सौंदर्याचे कौतुक करण्याचा आणि पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय पर्यटन दिनाची संकल्पना ग्रामीण आणि समुदाय केंद्रित पर्यटन अशी आहे.