होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

शून्य साठी फोटो काढा - शून्य - झिरो पोल्युशन मोबिलिटी मोहिमेसाठी छायाचित्रण स्पर्धा

शून्य साठी फोटो काढा - शून्य - झिरो पोल्युशन मोबिलिटी मोहिमेसाठी छायाचित्रण स्पर्धा
सुरुवातीची तारीख:
Oct 22, 2022
शेवटची तारीख:
Dec 15, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

शून्य झीरो पोल्युशन मोबिलिटी हे नीती आयोग आणि RMI द्वारे आयोजित केलेले कॉर्पोरेट-नेतृत्व असलेले व प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधणारे अभियान आहे जे राईड देण्यासाठी आणि डिलिव्हरी सुविधांसाठी ...

शून्य झीरो पोल्युशन मोबिलिटी हे नीती आयोग आणि RMI द्वारे आयोजित केलेले कॉर्पोरेट-नेतृत्व असलेले व प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधणारे अभियान आहे जे राईड देण्यासाठी आणि डिलिव्हरी सुविधांसाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देते. 100 % विद्युतीकरणाच्या मार्गावर शेवटच्या मैलापर्यंत डिलिव्हरी आणि अंतिम मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी पुरवणे हे शून्यचे उद्दिष्ट आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी शून्य अभियान सुरू करण्यात आले होते. त्यावेळेसच्या 30 उद्योग भागीदारांपासून यामध्ये आज सुमारे 130 भागीदारांपर्यंत वाढ झाली आहे.

भारतातील इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि संबंधित चार्जिंग पायाभूत सुविधांची ओळख पटवण्यासाठी फोटोग्राफी स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यासाठी शून्य अभियान मायगव्ह इंडियासोबत सहयोग करत आहे.

निवड निकष
प्रवेशिकेत शून्यची तत्वे प्रतिबिंबित झाली पाहिजेत, जसे:
1. इलेक्ट्रिक वाहने, आणि संबंधित घटक जसे की, स्वच्छ हवा आणि पर्यावरण, आरोग्यसंबंधी फायदे.

2. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाशी संबंधित घटक ज्यामध्ये, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि EV चार्जरच्या चित्रांचा सामावेश आहे परंतु या पुरतेच मर्यादित नाहीत.

3. प्रत्येक प्रवेशिकेत खालील गोष्टींचा समावेश असला पाहिजे:
a. जास्तीत जास्त दोन (2) फोटो
b. प्रत्येक फोटोसाठी कॅप्शन (प्रति कॅप्शन सहा शब्दांपेक्षा जास्त नाही)
c. स्थान (राज्य/जिल्हा/शहर)
d. फोटो काढल्याची तारीख (दिवस/महिना/वर्ष)

4. प्रत्येक फोटो 5 MB पेक्षा कमी असावा आणि फक्त JPG स्वरूपात डाउनलोड करण्यायोग्य असावा. फोटो लँडस्केप किंवा पोर्ट्रेट स्वरुपात असू शकतो.

5. प्रवेशिका मूळ असावी आणि यापूर्वी कोणत्याही छापील किंवा डिजिटल माध्यमात प्रकाशित झालेली नसावी.

6. प्रवेशिकेत कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क प्रतिमा आणि लोगोचा समावेश असू नये.

7. या स्पर्धेत सेल्फी अपात्र ठरविण्यात येणार आहे.

8. नागरिक सोशल मीडिया चॅनेलवर त्यांच्या प्रवेशिका शेअर करू शकतात आणि @Shoonya_India ला टॅग करू शकतात आणि #SnapforShoonya वापरू शकतात आणि खाली वर्णन मध्ये लिंक शेअर करू शकतात.

पारितोषिके:
1 ले बक्षीस: 5,000/- रुपये
2 रे बक्षीस: 3,000/- रुपये
3 रे बक्षीस: 2,000/- रुपये
प्रथम 10 प्रवेशिकांना प्रशस्तीपत्रक मिळेल आणि ती शून्य मोहिमेच्या सोशल मीडिया पेजेस आणि वेबसाइटवर चित्रित केली जातील.

सादर करण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2022.

येथे येथे आणि नियम व अटी पहा (PDF -122 KB).

SUBMISSIONS UNDER THIS TASK
430
Total
0
Approved
430
Under Review
Reset