होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

युवा प्लॅटफॉर्मसाठी लोगो डिझाइन स्पर्धा

युवा प्लॅटफॉर्मसाठी लोगो डिझाइन स्पर्धा
सुरुवातीची तारीख:
Jun 20, 2023
शेवटची तारीख:
Jul 20, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

युवा प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आणि भारताच्या प्रगत करण्याच्या त्यांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी संभाव्य बदल घडवण्याची कल्पना करत आहे...

युवा प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आणि भारताच्या प्रगत करण्याच्या त्यांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी संभाव्य बदल घडवण्याची कल्पना करत आहे. अंदाजे 38 कोटी तरुणांना सेवा आणि माहिती प्रदान करण्यासाठी हे वन-स्टॉप तंत्रज्ञान व्यासपीठ असेल, जे त्यांना त्यांच्या क्षमतेचा लाभ घेण्यास मदत करेल, तसेच अधिक सक्षम आणि सकारात्मक समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यात प्रभावी ठरेल.

युवक व्यवहार विभाग हे व्यक्तिमत्व निर्मिती आणि राष्ट्र निर्मिती म्हणजेच युवकांचे व्यक्तिमत्व विकसित करणे आणि त्यांना विविध राष्ट्र-निर्माण उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे या दोन उद्दिष्टांचा पाठपुरावा करतो.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत युवा व्यवहार विभाग (DoYA) युवकांशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी एक सहाय्यक आणि उत्प्रेरक एजंट म्हणून कार्य करतो.

या बाबतीत, मायगव्ह - डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या सहकार्याने युवा व्यवहार विभाग आयोजित करत आहे युवा प्लॅटफॉर्मसाठी लोगो डिझाइन स्पर्धा जिथे आम्ही नागरिकांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्यासाठी आणि एक योग्य लोगो तयार करण्यासाठी आमंत्रित करणार आहोत, जो युवा प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेसह आणि व्यापक प्रसारासह सहजपणे संबंधित असू शकेल.

तांत्रिक मापदंड:

1. सहभागींनी फक्त JPEG / JPG / PNG स्वरूपात लोगो अपलोड केला पाहिजे.
लोगोची रचना डिजिटल प्लॅटफॉर्मवर केलेली असली पाहिजे.
2. स्पर्धेच्या विजेत्याला संपादनयोग्य आणि ओपन फाइल स्वरूपात डिझाइन सादर करणे आवश्यक असेल.
3. सहभागींनी मूळ डिझाईन्स सादर केल्याची खात्री करून घ्यावी.
4. प्रत्येक प्रवेशिकेसाठी डिझाईन केलेल्या लोगोसह त्या विषयी तर्कसंगत आणि सर्जनशील विचार (100 पेक्षा जास्त शब्दात नाही) तपशीलवार आणि स्पष्टपणे सादर केले पाहिजेत.
5. लोगो रंगीत स्वरूपात डिझाइन केला असला पाहिजे. लोगोचा आकार पोर्ट्रेट किंवा लँडस्केप मोड मध्ये 5cm * 5cm ते 30cm * 30cm असा असू शकतो.
6. हा लोगो Twitter/ Facebook सारख्या वेबसाईट/ सोशल मीडियावर, प्रसिद्धीपत्रक यांवर वापरता आला पाहिजे आणि स्टेशनरी, संकेतचिन्हे, लेबले, इ., मासिके, जाहिराती, होल्डिंग्स, स्टॅण्डीज, ब्रोशर्स, लीफलेट्स, पॅम्फलेट, स्मृतीचिन्हे, आणि युवाचे इतर प्रचार आणि विपणन साहित्य यांच्यावर छापता आला पाहिजे.
7. लोगोची प्रतिमा किमान 300 DPI सह उच्च रिझोल्यूशनची असली पाहिजे.
8. 100% वर स्क्रीनवर पाहिल्यावर लोगो स्वच्छ दिसला पाहिजे (पिक्सेल किंवा बिट-मॅप्ड नाही).
9. प्रवेशिका कम्प्रेस्ड किंवा सेल्फ एक्सट्रॅक्ट स्वरूपात सादर करू नये.
10. लोगो डिझाइनवर छाप किंवा वॉटरमार्क नसले पाहिजेत.

मूल्यमापन निकष:

1. या प्रवेशिकांची निवड खालील निकषांच्या आधारे केली जाईल
- नाव आणि युवाच्या एकूण थीमसह संरेखन
- सर्जनशीलता
- मौलिकता
- साधेपणा
- प्रेरणादायी घटक
2. कोणत्याही श्रेणीत आवश्यक विजेत्यांपेक्षा अधिक असल्यास, पुढील निवड ड्रॉच्या मदतीने केली जाईल.
3. निवड समितीचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल आणि कोणत्याही स्पर्धकांना किंवा निवड समितीच्या कोणत्याही निर्णयाबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

बक्षिसे:

निवडलेल्या प्रवेशिकेला 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

इथे क्लिक करा नियम व अटी वाचण्यासाठी PDF(71.88 KB)

या टास्क अंतर्गत सादर
680
एकूण
0
मंजूर
680
आढावा अंतर्गत