होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

ग्लोबल बायोफ्यूल अलायन्ससाठी लोगो डिझाइन करा

ग्लोबल बायोफ्यूल अलायन्ससाठी लोगो डिझाइन करा
प्रारंभ दिनांक :
Oct 26, 2023
शेवटची तारीख:
Nov 27, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची सुरुवात 23 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या G-20 नेतृत्त्व शिखर परिषदेमध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते व 8 देशांच्या मदतीने करण्यात आली ...

ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची सुरुवात 23 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या G-20 नेतृत्त्व शिखर परिषदेमध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते व 8 देशांच्या मदतीने करण्यात आली आणि यासाठी 19 देश व 12 आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील सहकार्य केले. जैवइंधनाची प्रगती आणि व्यापक प्रमाणात त्याचा वापर व्हावा यासाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्प्रेरक मंच म्हणून सेवा देणे हा GBA चा उद्देश आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय मायगव्हच्या सहकार्याने ग्लोबल बायोफ्यूल अलायन्ससाठी लोगो डिझाईन करण्याची स्पर्धा आयोजित करत आहे. या महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रमाच्या संकल्पनेशी संबंधित असलेल्या आणि डीकार्बोनाइझेशन मार्ग म्हणून जैवइंधनाचा संदेश देणाऱ्या लोगोची रचना करण्यासाठी आपली सर्जनशील प्रतिभा दाखवण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले जाते.

लोगोचा विषय
1. या लोगोचा उद्देश एक शक्तिशाली आणि लगेच ओळखता येईल अशी दृश्य प्रतिमा स्थापित करणे आहे. यावरून जैवइंधनाचा अवलंब करण्याच्या GBA मिशनची थोडक्यात माहिती मिळायला हवी.
2. याव्यतिरिक्त, लोगो अष्टपैलू आणि स्केलेबल असावा आणि तो प्रभावीपणे विविध माध्यमांमध्ये आणि प्रचार सामग्रीवर वापरला जाऊ शकेल असा, संस्थेचा संदेश आणि प्रभाव वाढवणारा असेल हे सुनिश्चित करा.
3. लोगोची रचना करण्याच्या स्पर्धेचा उद्देश सदस्य देशांच्या समर्थनासह GBA बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्जनशील माध्यमांद्वारे आणि सार्वजनिक सहभागाद्वारे सदस्य / पर्यवेक्षक देशांमधील नागरिकांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवणे आहे.

स्वरूप आणि प्रक्रिया मार्गदर्शक तत्त्वे:
1. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागींंनी स्वत: www.mygov.in पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
2. फाइलचे प्राधान्य स्वरूप: jpg, png
3. जास्तीत जास्त परिमाण: 1000 x 1000 पिक्सेल
4. लोगो डिजिटल प्लॅटफॉर्मवर रचना केलेला असला पाहिजे
5. आवृत्ती आवश्यक: एक पूर्ण रंगीत आवृत्ती आणि एक काळी-पांढरी आवृत्ती.
6. विनंती केल्यास सहभागींना ओपन फाइल्स/व्हेक्टर फॉरमॅट्स (AI, EPS, इ.) द्याव्या लागतील.
7. सर्व प्रवेशिका केंद्रस्थानी एकत्र केल्या जातील आणि प्रत्येक देशातून आलेल्या प्रवेशिका त्या देशाच्या POC सोबत सामायिक केल्या जातील.
8. विजेत्याला देयक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिले जाईल, ज्यासाठी विजेत्याच्या घोषणेनंतर विजेत्याकडून आवश्यक बँक तपशील घेतले जातील.

मूल्यमापन निकष:
1. सर्जनशीलता, मौलिकता, रचना, तांत्रिक उत्कृष्टता, साधेपणा, कलात्मक गुणवत्ता आणि व्हिज्युअल प्रभाव आणि ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची संकल्पना किती चांगल्या प्रकारे दर्शवली गेली आहे या घटकांच्या आधारे विजेत्या प्रवेशिका निवडल्या जातील.
2. अनुकूलता / व्यावहारिकता: या लोगोचा वापर प्रकल्पासाठी वेगवेगळ्या माध्यमांवर आणि स्रोतांवर (वेबसाइट्स, ईमेल, माहिती उत्पादने, बॅनर, ब्रोशर इत्यादी) केला जाईल
3. स्केलेबिलिटी: वाचनीयता आणि बदलत्या आकारातील परिणाम हे महत्वाचे निकष आहेत.
4. नावीन्यपूर्णता: रचनेचे सर्जनशील घटक कोणते आहेत आणि कलाकाराणे रचनेमध्ये सर्जनशीलता आणि मौलिकता किती चांगल्याप्रकारे वापरली आहे?
5. थीमशी संबंधित: अलायन्सच्या उद्दिष्टांशी संबंधित संदेश या रचनेमध्ये दिला गेला पाहिजे.

पारितोषिके/ बक्षिसे:
1. विजेत्या प्रवेशिकेला 1000/- अमेरिकन डॉलरचे रोख बक्षीस दिले जाईल
2. अव्वल 5 प्रवेशिकांचा विशेष उल्लेख केला जाईल

येथे क्लिक करा for Terms and Condition. pdf (80.95 KB)

या कार्यांतर्गत सादरीकरण
851
संपूर्ण
0
मंजूर
851
पुनरावलोकनाखाली
Reset