होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पर्यावरणासाठी जीवनशैली - LiFE

बॅनर
LiFE मोहिमेबद्दल

पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानातील बदल या जागतिक घटना आहे ज्यामध्ये जगाच्या एका भागातील होणाऱ्या कार्यामुळे जगभरातील इकोसिस्टम्स आणि लोकसंख्येवर परिणाम होतो. बदलत्या पर्यावरणाविरोधात आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास जागतिक स्तरावर अंदाजे 3 अब्ज लोकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2050 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी सुमारे 18% पर्यंत कमी होऊ शकतो.

गेल्या दोन दशकांत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि हवामान बदल या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक व्यापक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये धोरणात्मक सुधारणा, आर्थिक प्रोत्साहन आणि नियमांचा समावेश आहे. हे सर्व उपाय प्रचंड कार्यक्षम असूनही, वैयक्तिक, सामुदायिक आणि संस्था स्तरावर आवश्यक कार्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही.

केवळ वैयक्तिक आणि सामुदायिक वागणुकीत बदल करून देखील पर्यावरण आणि हवामानाच्या संकटांमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) आठ अब्ज लोकसंख्येपैकी एक अब्ज लोकांनी जरी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वागणूक स्वीकारली तरी जागतिक कार्बन उत्सर्जनात अंदाजे 20 टक्क्यांनी घट होऊ शकते.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी

या संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 नोव्हेंबर, 2021 रोजी ग्लासगो येथील COP26 मध्ये पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) ही संकल्पना सादर केली होती, ज्यामध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी निष्काळजीपणे व विध्वंसकपणे पर्यावरणाचा ऱ्हास करण्याऐवजी विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक त्याचा वापर करण्यासाठी संस्थांना आणि लोकांच्या जागतिक समुदायाला आंतरराष्ट्रीय जनआंदोलन म्हणून LiFE स्वीकारण्याचे आवाहन केले. LiFE आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी देते की आपण असे आयुष्य जगले पाहिजे जे पर्यावरणपूरक असेल आणि पृथ्वीचे नुकसान करणारे नसेल. अशा जीवनशैलीचा स्वीकार करणाऱ्या लोकांना LiFE मध्ये प्रो-प्लॅनेट पीपल म्हणून ओळखले जाते.

परंतु आपली जीवनशैली बदलणे मात्र इतके सोपे नाही. आपल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात खोलवर रुजलेल्या असतात आणि आपल्या पर्यावरणातील अनेक घटकांद्वारे सतत मजबूत होत असतात. पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करण्याच्या आपल्या हेतूचे नेहमीच कृतीत रुपांतर करणे सोपे नसते. तथापि, असे करणे अशक्य मात्र नक्कीच नाही. एका वेळी एक कार्य करून आणि दररोज एक बदल करून आपण आपली जीवनशैली बदलू शकतो आणि दीर्घकाळासाठी पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करू शकतो. अध्ययन असे सुचविते की कोणत्याही कृतीचा किमान 21 दिवस सराव केल्याने ती सवय बनू शकते.

त्या संदर्भात, भारतीयांना 21 दिवस दररोज एखादी सोपी पर्यावरण-पूरक कार्य करण्यास मदत करण्यासाठी आणि अखेरीस पर्यावरण-पूरक जीवनशैली विकसित करण्यासाठी LiFE 21-दिवस आव्हान सुरू केले आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात एक छोटीशी गोष्ट बदलून प्रो-प्लॅनेट पीपल बनण्यासाठी हे आव्हान आहे.

व्हिडिओ गॅलरी

" LiFE ": एक-शाब्दिक चळवळ | ग्लासगो येथील COP26 शिखर परिषद

L.I.F.E. च्या मदतीने पर्यावरण जतन करणे.

लाइफ साठी रिसायकल करणे म्हणजे काय?