होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

शोध आणि नावीन्यपूर्णतेवर युवकांकडून (15-29 वर्षे) कल्पना मागवत आहे

शोध आणि नावीन्यपूर्णतेवर युवकांकडून (15-29 वर्षे) कल्पना मागवत आहे
सुरुवातीची तारीख:
Oct 11, 2022
शेवटची तारीख:
Nov 09, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

जगातील सर्वात जास्त युवा लोकसंख्या भारतात आहे. लोकसंख्येचा हा हिस्सा, कार्यामध्ये सहभाग आणि अवलंबित्व यांच्या गुणोत्तरावर त्याच्या परिणामाचा विचार करता ...

जगातील सर्वात जास्त युवा लोकसंख्या भारतात आहे. लोकसंख्येचा हा हिस्सा, कार्यामध्ये सहभाग आणि अवलंबित्व यांच्या गुणोत्तरावर त्याच्या परिणामाचा विचार करता, आपल्या देशाच्या वाढ आणि विकास दृष्टीने एक चांगली संधी आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वी या संधी फायदा घेणे अतिशय आवश्यक आहे.

युवकांच्या रचनात्मक आणि सर्जनशील शक्तींचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, युवक कल्याण विभाग व्यक्तिमत्व-उभारणी आणि राष्ट्र-उभारणी या दुहेरी उद्दिष्टांचा पाठपुरावा करतो, म्हणजेच, युवकांच्या व्यक्तिमत्त्वांचा विकास करतो आणि त्यांना विविध राष्ट्र-उभारणी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतो.

तरुण मुलांचे प्रशिक्षण, शिक्षण आणि कौशल्य आपल्या समाजातील काही सर्वात मौल्यवान संसाधने आहेत, आणि ते भविष्यातील गुंतागुंतीच्या समस्यांना सोडवण्यामध्ये त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. अपवादात्मक रित्या कुशल युवकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर खोलवर परिणाम होतो आणि त्यांची काम करण्याची, संवाद साधण्याची पद्धत बदलते; ते विकासात्मक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. ते जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यता देखील आणतात.

शिक्षण आणि कौशल्ये आणि नाविन्यता आणि शोध आणि त्याद्वारे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विकास यांच्यात खूप घनिष्ठ संबंध आहे यात आश्चर्य नाही. हे साध्य करण्यासाठी, तरुण आणि किशोरवयीन मुलांना सतत सक्षम आणि विकसित करण्याच्या उद्देशाने, मुलांच्या सर्जनशीलतेला ओळखून त्यासाठी प्रोत्साहन देण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार मायगव्ह वर एक महिन्याच्या कालावधीसाठी देशातील तरुणांसह चर्चा आयोजित करत आहे/त्यांच्याकडून सूचना मागवत आहे ज्यांच्याकडे शोध लावण्याची आणि नाविन्याची विलक्षण कौशल्ये आहेत. प्राप्त झालेल्या माहितीचा आढावा संबंधित मंत्रालय/विभाग घेतील आणि यामधून काही प्रवेशिका निवडल्या जातील. ज्या युवकांच्या प्रवेशिकांची निवड करण्यात आली आहे, त्यांना प्रत्यक्ष किंवा आभासी मार्गाने राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेत त्यांच्या कल्पनांचे विस्तृत सादरीकरण करण्यास सांगितले जाऊ शकते.

सादर करण्याची शेवटची तारीख: 9 नोव्हेंबर 2022