होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

भारतीय ज्ञान प्रणाली

भारतीय ज्ञान प्रणाली

परिचय

नमस्ते आणि स्वागतम्!

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली येथील शिक्षण मंत्रालयाचा भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) विभागाला समृद्ध भारतीय वारशाच्या विविध पैलूंबद्दल जागरुकता, परिचय आणि कौतुक निर्माण करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी IKS विषयावर आधारित सहा स्पर्धांची घोषणा करताना आनंद होत आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास, महत्त्व, अनुप्रयोग आणि लाभांची माहिती देणाऱ्या स्पष्टीकरणात्मक मजकूरासह छायाचित्रे आणि लहान व्हिडिओंसारख्या मल्टी-मीडिया सामग्रीचा वापर करून स्थानिक परंपरा आणि पद्धतींचे दस्तऐवजीकरण आणि प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. तरुणांना त्यांच्या प्रवेशिकांसाठी त्यांच्या कुटुंबातील आणि समुदायातील ज्येष्ठांशी सहकार्य करण्यास अत्यंत प्रोत्साहित केले जात आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणासाठी शाश्वत आणि प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या अनोख्या परंपरेबद्दल अभिमानाची भावना रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. IKS चे हे युवा राजदूत संपूर्ण जगाला भारताच्या सुंदर विविधतेमध्ये भारतीय संस्कृती शोध घेण्याची प्रेरणा देतील. दावे किंवा प्र्वेशिकेच्या पुनर्मूल्यांकनाशी संबंधित कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही.