होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

डिजिटल इंडिया

या ग्रुपमधील अ‍ॅक्टिव्हिटीज
तयार केले : 22/07/2014
वरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

डिजिटल तंत्रज्ञान, ज्यात क्लाउड कम्प्युटिंग आणि मोबाइल ॲप्लिकेशन्सचा समावेश आहे, हे जगभरातील जलद आर्थिक विकास आणि नागरिक सशक्तीकरणासाठी उत्प्रेरक म्हणून उदयास आले आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण रोजच्या जीवनात रिटेल स्टोअर्सपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत मोठ्या प्रमाणात करत आहोत. ते आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्यास मदत करतात आणि आपल्याला भेडसावणा-या समस्या आणि चिंतांची माहिती देखील देतात. काही प्रकरणांमध्ये ते त्या समस्यांचे निराकरण देखील अत्यंत कमी वेळेत करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि व्यावहारिक उपाय शोधणे हा डिजिटल इंडिया समूहाचा उद्देश आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व नागरिकांसाठी संधी निर्माण करणे आणि आपल्या देशाचा कायापालट करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. प्रत्येक नागरिकाला डिजिटल सेवा, ज्ञान आणि माहिती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. डिजिटल इंडियाचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा समूह जगभरातील धोरणे आणि उत्तम पद्धती घेऊन येणार आहे.