बाजरी हा शतकानुशतके आपल्या आहाराचा अविभाज्य भाग राहिला आहे. बाजरीमध्ये अनेक आरोग्यदायी लाभ तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त कमी पाणी आणि इतर गरजा कमी असल्याने ही पर्यावरणासाठी देखील उत्तम आहे. बाजरीच्या फायद्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी व बाजरीचे उत्पादन व वापर वाढविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी भारत सरकारच्या सांगण्यावरून 2023 या वर्षाला आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष घोषित केले.